Home बातम्या उमा प्रकाश भेंडे यांना आदरांजली

उमा प्रकाश भेंडे यांना आदरांजली

0

जेष्ठ अभिनेत्री स्वर्गीय उमा प्रकाश भेंडे यांचा नववा स्मृतिदिन काल;19 जुलै रोजी होता. या निमित्ताने मुंबईतील सायन परिसरातील उमा भेंडे चौक या ठिकाणी सायन येथील त्यांच्या चाहत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली.

या प्रसंगी लेखा व कोषागार विभागाचे निवृत्त लेखाधिकारी श्री.विकास काटकर यांनी उमाजींचे सायन मधील नागरिकांशी कसे हृद्य संबंध होते, या विषयीच्या आठवणी सांगितल्या.

श्री.सुहास बने यांनी उमा प्रकाश भेंडे यांच्या चित्रपट कारकिर्दीचा आढावा घेतला. सायन दर्पणचे संपादक श्री.संजीव उंडाळकर यांनीही त्यांच्या दैदीप्यमान कारकिर्दीचा यथोचित गौरव केला.

यावेळी उमाजींचे चिरंजीव श्री.प्रसाद व स्नुषा सौ.किमया या आवर्जून उपस्थित होत्या. सौ.किमया यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या स्मृतिदिनास शैलजा पाठक, श्री व सौ.कीर्तने, ॲड.राजेंद्र कोरडे, श्री व सौ उमाकांत तासगावकर, श्री.कुट्टी, श्री गांधी, स्नेहल वर्हाडी, दत्ता शिंदे, अर्जुन कुंचीकोरवे, विजय कोल्हटकर आदी नागरिक उपस्थित होते.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version