Home साहित्य कधी कधी स्वतःला….

कधी कधी स्वतःला….

0

कधी कधी स्वतःला, एक प्रश्न विचारा,
मला माझ्याबद्दल वाटते, ते खरे आहे काय ?
आजवर जे जे केले, अनुभव जे मिळाले,
जी वाट मी निवडली, ती योग्य आहे काय ?

थोडं जरा अवलोकन, नीट करावं लागेल,
नवं ध्येय ठरवून, पुन्हा पुढं जावं लागेल,
थोडा ताण येईल, कष्ट नव्याने पडतील,
हे ही नवं आव्हान आहे, दुसरा काय उपाय ?

फक्त काही दिवस, शरीराचे होईल बंड,
मन सारखे खेचेल मागे, निराशेचा भयगंड,
मग हळूहळू रुळेल मन, येतील आनंदाचे क्षण,
नवी दिशा, नवी उर्जा, नवे क्षितिज, शोधले म्हण..!!!

हेमंत भिडे

— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 98694 84800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version