आज गुरू पोर्णिमा आहे. या निमित्ताने काही रचना सादर करीत आहे. गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. – संपादक
१) गुरुपौर्णिमा
मंगलदिन हा अजि उगवला
गुरुवर्यांचे पूजन करण्या
ज्ञानामृत ते पाजूनी आम्हां
मार्ग दाविती जीवन जगण्या
मातापितरांसवे देतसे
गुरु जीवना आकार
गुरुपौर्णिमा करू साजरी
पुष्पांजली वाहून चरणावर
लभ्य प्रेरणा गुरुच देती
लघु मधुनी ते गुरु बनविती
एकरूपता मार्ग दर्शविती
पूजण्या कृतज्ञ मनी राहती
गुरुप्रेम ज्ञान,सूर्य,शक्ति
हिमाचलाप्रती गुरुची शांती
सत्याचे पूजन शिष्य जाणती
आचरुनी गुरुभक्ति ते करिती
व्यास मुनींना गुरु मानती
निःस्वार्थ भावना हृदयी वसती
जीवनव्रत प्रचार संस्कृती
पंचारती घेऊनी पुष्पांनी पूजती
— रचना : स्वाती दामले.
2) गुरु
गुरुदेव तुम्हा, जपतानामे
मम अंतर्मनी तुम्ही वसले
सतत गुरूंचे दर्शन होई
हृदयी माझ्या गं ठसले… 1
गुरुवर्य माझे मनात चित्ती
प्रणाम माझा गुरूंच्या प्रति
जप चिंतना शिवाय गती
अन्य सुख मज नसती…2
नाम स्मरण हे तारील हरी
पुण्यफल मम हीच शिदोरी
श्रीगुरुचे परम धाम घरी
असता चिंताभय नचउरी..3
जपनामाची करा कमाई
सतगुरू नामे एक चिंतनी
जन्म मृत्यूचा फेरा न राही
योगीराज होअसेस्मरणी…4
–– सौ. मीना घोडविंदे, ठाणे.
3) गुरू बळ
तिन्ही लोकी ज्यांचा मान
सर्वजण त्यांना समान
उच्च असते गुरूंचे स्थान
गुरू मध्ये दिसतो परमार्थ
मनी नसे कोणता स्वार्थ
जगण्याला मिळतो अर्थ
गुरू एक अनमोल हिरा
अद्भुत ज्ञानाचा खजिना
यशाचा अदृश्य जिना
गुरूंची जेव्हा असते साथ
प्रत्येक संकटावर होते मात
उज्जवल भविष्याची ती वाट
गुरू चरणी होता लीन
क्षणात घालावी सर्व शीण
गुरू शिष्याची अद्भुत वीन
गुरूंचे ठेवता आदर्श
शब्द करी मनाला स्पर्श
लढण्यात ही असतो हर्ष
गुरूंचे लाभता आशीर्वाद
हृदयाची ऐकता साद
सुप्त गुणांना मिळते दाद
गुरू दाखवी योग्य दिशा
सातत्य व प्रयत्नांची परीक्षा
संपते कठीण ती प्रतीक्षा
गुरुंवर असता पूर्ण विश्वास
निर्माण होतो आत्मविश्वास
जिंकण्याची अतूट ध्यास.
गुरूंचे जीवनात असता बळ
इच्छाशक्ती होते अधिक प्रभळ
आनंदाने भरून वाहे ओंजळ.
— रचना : रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
