Home साहित्य दिवाळी फराळ

दिवाळी फराळ

0

दिन दिन दिवाळी
आली घेऊन शान
फराळाला आता आला भलताच मान

घरगुती, नेहमीचीच ही दुकान
आता बारा महिने तेरा काळ
फराळ मिळतो तिन्ही त्रिकाळ

घरी फराळ कोण करत बसणार.
उगीच पसारा कोण मग आवरणार

चकलीसाठी आधी धान्ये भाजा
मग चक्कीत जाऊन ते दळा

लाडू साठी बेसन तूपात भाजा
रव्याच्या लाडू साठी तूप बेदाणे घालून वळा
शंकरपाळी साठी किती ते लाटा.
चिवड्यासाठी मोठी भांडी काढा.

मग तो पसारा पडलेला किती तो आवरा.
एवढा खटाटोप मी नाही बाई करणार

घरची साफसफाई काही कमी आहे का…
मला वेळ नाही बाई
मी फराळ घरी नाही करणार
मी मस्त फराळ विकतच आणणार.
फराळ ! नाही रे बाबा ! मी घरी नाही करणार.

तेल, तूप, रवा, मैदा हे तेलकट ते तूपकट
यात ही काही फराळचं उरलं सुरलं
कुठे कुठे डब्यात, काय कुठे ठेवणार ?

पणत्या, रांगोळी, आकाशकंदील च्या
नावाखाली दिवाळीत साडी तर मी घेणार.

यासाठी तर मी वेळात वेळ काढून
कितीही गर्दी, कितीही ट्राफिक असो..
चार दूकानं तरी नक्कीच मी फिरणार.

शाॅपीगं तर बाई मी करणार.
शाॅपीगं तर बाई मी करणार.
त्याला वेळ नाही कस् मी म्हणणार ?

साडी शिवाय दिवाळी मी
कशी साजरी करणार ?

पूर्णिमा शेंडे.

— रचना : पूर्णिमा शेंडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version