Home साहित्य ध्यान बदल….

ध्यान बदल….

0

मला बदलायच आहे,
म्हणजे काय ?
शरीरात बदल हवा,
की आत्म्यात ?

मनात बदल हवा,
की हृदयात ?
स्थूल, सूक्ष्म की कारण
शरीर बदल ?

शरीरात बदल म्हणजे,
योगा व व्यायाम,
हृदयात बदल म्हणजे,
भावना जपणे,

मनात बदल म्हणजे,
विचार जपणे,
आत्म्यात बदल म्हणजे,
इतरांना जपणे

शरीर व आत्म बदल,
यासाठी मन महत्वाचे,
मनात आलेले
विचार व कृती महत्वाची,

थोडा निश्चय, निर्धार व
थोडी मुरड महत्वाची,
करून बघा,
ही तर किल्ली आनंदाची,

मन मोकळं करा
राग, त्वेष, घृणा काढा,
अनेक प्रसंगी साठवलेले,
ते सारे सोडा,

बघा किती हलकं,
प्रसन्न, आनंदी वाटतं,
हीच ती वाट,
ज्याने समाधान मिळतं…!!!

हेमंत भिडे

— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version