Home साहित्य प्रेम म्हणजे काय…

प्रेम म्हणजे काय…

2

प्रेम म्हणजे काय
विचारावं सागरतळी
दडलेल्या त्या मोत्यांना

प्रेम म्हणजे काय
विचारावं श्रावणसरित न्हाऊन
नववधू परी नटलेल्या सृष्टीस

हो खरं प्रेम काय असतं
ते विचारावं सागर मिलनास
व्याकुळ झालेल्या सरितेस

प्रेम नेमकं असतं तरी काय
ते विचारावं नकळतपणे
पानाआड उमललेल्या त्या कळीस

विचारावं प्रेम काय असतं
काळोखातून लख्ख प्रकाशाकडे
नेणाऱ्या त्या सुंदर पहाटेस

नेमकं प्रेम काय असतं
विचाराव ओसाड माळरानावर एकटाच
थाटात उभा राहिलेल्या त्या काटेरी झुडपास

प्रेम म्हणजे फक्त प्रेम असतं
सृष्टीच्या प्रत्येक चराचरात
प्रेमाचं अस्तित्व असतं

मात्र खरं प्रेम समजण्यासाठी
फक्त एक सुंदर, निर्मळ, पवित्र मन लागतं

पुनम सुलाने

– रचना : पूनम सुलाने. हैदराबाद

2 COMMENTS

  1. कविता छानच आहे. शेवटची दोन कडवी मनाला भावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version