उत्साह व प्रेरणा नेहमी आंतून येते,
याचे चित्त शांतीशी, आहे खरे नाते,
ही आहे सातत्याच्या, ध्यानाची पावती,
ज्याने विचार मंथन, नवे होऊन जाते,
ज्याने साधला आहे, समतोल मनाचा
लक्ष्य ठरवले आहे, निश्चित विचार मनाचा
ज्याला समाधान आहे, जे मिळाले त्याचे,
तो हळूहळू गाठत आहे, शिखर यशाचे
कोलाहल सर्वत्र असता जो वेगळा राही
गरजेनुसार ज्ञान वाढवी आपुले पाही
ज्यास क्षमता समजल्या कौशल्य वाढवले
त्यास प्रेरणेचे झरे सापडले…!!!
— लेखन : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
