Home साहित्य “मतदान करा हो ! मतदान करा !”

“मतदान करा हो ! मतदान करा !”

2

हक्क आपला मतदानाचा
चूकूनसुध्दा कधी सोडू नका
सुयोग्य आमदार निवडण्याचा
हक्क कधीही तुम्ही विसरु नका

कालावधी असतो पाच वर्षांचा
विधानसभा निवडणुकीचा
निज जीवन जगता येण्या सुखाने
सुयोग्य पात्र उमेदवार निवडा मताने

सकलांच्या हितासाठी
मतदान करा निज सुखसमृध्दीसाठी
निवडाल जर तुम्ही योग्य उमेदवार
तर होईल सुखकर तव जीवनकारभार

भारत आहे जगी समृध्द लोकशाही ठेवा
भारताचा बहूमान जगी सकलांनी वाढवा
प्रेमभाव सकलांनी एकमेकांशी ठेवावा
मतदानाचा हक्क आपला छान बजवावा

— रचना : मधुकर निलेगावकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

2 COMMENTS

  1. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.हे स्पष्ट करणारी सुरेख रचना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version