Home साहित्य मतदान

मतदान

1

१. मतदान माझा हक्क

चला मतदान करा
वय झालंय अठरा
शान तुम्ही या देशाची
नाव नोंद तुम्ही करा

चला मतदान करा
मना मनात रुजवा
लोकशाही अधिकार
योग्य बदल घडवा

चला मतदान करा
जाणा मताची किंमत
योग्य नेता निवडून
उन्नतीचा द्या हो मत

चला मतदान करा
कर्तव्य आपले बजवा
संविधानाने दिला हक्क
योग्य सरकार निवडा

— रचना : अनिसा सिकंदर. दौंड जि. पुणे

२. लोकशाहीचा संदेश

मतदान अधिकार आला दारा
हाच संदेश लोकशाहीचा खरा

मतदान करून कामे करा
हाच संदेश लोकशाहीचा खरा

मतदानासाठी वेळ काढा जरा
हाच संदेश लोकशाहीचा खरा

नौकरीतील कामे नंतर करा
हाच संदेश लोकशाहीचा खरा

मतदानाची शाई बोटावर मारा
हाच संदेश लोकशाहीचा खरा

महाराष्ट्र थाटाचा दाखवा तोरा
हाच संदेश लोकशाहीचा खरा

मायबाप हो मतदान करा
हाच संदेश लोकशाहीचा खरा

— रचना : गोविंद पाटील. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ.☎️ 9869484800

1 COMMENT

  1. आदरणीय संपादक साहेब नमस्कार
    कारण आपण माझ्या लेखनावर आपले दोघांचे आशिर्वाद, प्रेम आहे व मार्गदर्शन करतात आमच्या सर्वांच्या आवडत्या ,वाचनीय, सुप्रसिद्ध न्यूज स्टोरी टुडे मध्ये माझ्या लेखनाला समावेश करता या बद्दल धन्यवाद.

    गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version