सरोज आपल्या आजी सोबत मामाच्या गावी जाण्यासाठी स्टँडवर आली. बसस्थानकावरची गर्दी पाहून आरक्षण करायला हवं होतं असा विचार तिच्या मनात आला. नांदेड- नागपूर हा लांबचा प्रवास उभ्यानेच करावयाचा या विचाराने सरोजच्या अंगावर काटा आला. नियोजित वेळी बस लागली. रेटारेटी सुरु झाली आणि वाहकाचा आवाज आला,
“पुर्ण आरक्षण आहे, नंतर उठावं लागेल, दुसऱ्याच्या सीटवर बसू नका.”
अगोदरच घाबरलेली सरोज जास्तच बावरली. रेटारेटीमध्ये तिच्या आजीला चढताही येईना. म्हणून ती आजीला म्हणाली,
“थांब आजी, जाऊ शेवटी. नाही तर जाता येईल उद्या. खूप गर्दी आहे. उभ्यानेच जाव लागेल.”
“अहो ताई, आरामाने या ह्या सीटचे आरक्षण नसते. मी जागा धरली आहे. सर्वात शेवटी या.” पुढल्या एका खिडकीतून आवाज आला.
“थँक्स !” म्हणत तिने मनातल्या मनात त्याचे आभार मानले. सर्वात शेवटी चढले तरी समोरच्या सीटवर जाणे म्हणजे एखादा मोठा पर्वत चढून जाण्याइतके कठीण होते. उभे राहिलेली माणसं तरी बाजुला होतात का ! त्यांना तर थोडासा का होईना स्पर्श झाला म्हणजे स्वर्ग दोन बोटे उरतो.
“या, ताई बसा. तुमची तारांबळ मी पाहिली. मला ही जागा मिळवायची होती त्यात तुमची ही जागा धरली. “फार उपकार झाले हं भाऊ ! बस आजी पलीकडे. ” अस म्हणता क्षणी त्या प्रवाशाचा चेहरा उतरला हे सरोजने ताडले.
“चला तिकीटे घ्या.” वाहकाने आवाज दिला. सरोज तिकिटासाठी ऊठू लागली. तो माणूस म्हणाला “ताई, पैसे द्या. मीच आणतो. मला माझेही तिकीट आणावयाचे आहे…’ “
– लेखन : नागेश शेवाळकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800