Home साहित्य माझं मन

माझं मन

1

आजकाल माझं मन मलाच म्हणतं
पुन्हा एकदा प्रेमात पडायला हवं
बऱ्याच गोष्टी नजरेआड झाल्यात
त्यांनाही महत्व द्यायला हवं

पुन्हा एकदा स्वप्न पहावी
पुन्हा एकदा चित्र रंगवावी
कुठल्याशा गाण्यावर ताल धरावा
थिरकायला ही आता शिकायला हवं

आपली चौकटी आपणच तोडावी
स्वतःवरचं बंधन झुगारायला हवं
उगाच आपण बांधून घेतो आपल्याला
सामाजिक पारड्यात तोलत राहतो स्वतःला

कधीतरी स्वतःसाठी जगायला हवं
स्वतःच्या प्रेमात ही पडायला हवं

राधा

–  रचना : राधा

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version