Home साहित्य माणसाला माणूस शोधतो मी !

माणसाला माणूस शोधतो मी !

0

माणूस शोधतो मी,
माणसातला माणूस शोधतो मी,

आले कितीक गेले
अवतार ते अवतार पाहिले मी,

कितीक मोठाल्या गर्जना ऐकल्या
हो, गर्जणारे पाहिले मी,

कितीक कर्दनकाळ पाहिले मी
कट्टर अभिमानी पाहिले मी,

परी माणसातली माणसे न कुठे
दिसली कां मला ती,

आर्त किंकाळ्या ऐकल्या मी,
सावरणारे हात न पाहिले मी

युगानुयुगे हे असेच चाललेले
पाहतो मी,

परी न पाहिले अश्रु पुसणारे
हात कां मी,

आक्रोश ऐकला,
उपासमार पाहिली मी,

न भुकेला दोन घास भरवताना
पाहिले मी,

अफाट संपत्ती चा अपव्यय
पाहिला मी,

घासातला घास दाता
नच पाहिला कां मी,

माणसातला माणूस शोधतो मी,
माणूस शोधतो मी !
😟😟😟😟

– रचना : स्वप्नगंधा सतीश. मुंबई,  विरार

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version