Home सेवा युवकांनो, अग्नीवीर व्हा !

युवकांनो, अग्नीवीर व्हा !

1

सुवर्ण संधी…. सुवर्ण संधी . .. भारतीय युवकांना अग्निपथ या योजने अंतर्गत भारतीय सेनेच्या तिन्ही (आर्मी, नेव्ही व हवाई दल) विभागात चार
वर्षांसाठी भरती होण्याची घोषणा नुकतीच भारत सरकारने केली आहे.

सशक्त भारत बनवण्यासाठी या युवकांचा खूप फायदा होणार आहे. कारण ऐन तारुण्यात भरती झाल्यानंतर आर्मी प्रमाणे त्यांना शिस्त लागेल. अनेक प्रकारच्या कामांचा सराव होऊन अनुभव, नेतृत्व गुण, धाडस आणि शरीर संपदा, सुदृढता येऊन हे नवयुवक भावी राष्ट्र उभारणी साठी मोलाचे योगदान देवू शकतील.

या अग्निपथ योजनेची खास वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :-
१) प्रत्येक वर्षी ५० हजार युवकांची भरती होणार असून चालू वर्षी ४६ हजार युवकांची भरती केली जाईल२) तीन ही सर्व्हिस चे भरती प्रक्रिये प्रमाणे अटी व शर्ती राहतील
३) सेवाकाल चार वर्षाचा असेल. त्यानंतर ज्यांना कायम व्हायचे असेल त्यांनी अर्ज करून सेवा काल कायम करण्याची तरतूद आहे, पण किमान १५ वर्ष सेवा करणे अनिवार्य असेल.४) सेवाकालात दरमहा पहिल्या वर्षी ३०,०००/- दुसऱ्या वर्षी ३३,००९/- तिसऱ्या वर्षी ३६,५००/- व चौथ्या वर्षी ४०,०००/- पगार असेल. त्यातून ७० टक्के रक्कम हातात मिळेल. त्यातून ३० टक्के रक्कम कॉर्पस फंड म्हणून कापली जाईल व चार वर्षानंतर सेवा निधी म्हणून ११,७१,०००/- रुपये रक्कम एक रकमी मिळतील.

५) ही योजना ९० दिवसाच्या आत सुरू होईल.
६) या चार वर्षाच्या सेवाकाळात या नव युवकांमध्ये विविध प्रकारचे सराव, अनुभव, शिस्त, विविध प्रकारचे कौशल्य, शरीर सुदृढता, धाडस व लीडरशिप सारखे गुण निर्माण होतील. जेणे करून चार वर्षाच्या सेवे नंतर बाहेर येवून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे व येताना जे एकरकमी सेवानिधी म्हणून ११ लाख ७१ हजार मिळणार आहेत ते भांडवल म्हणून कामी येतील आणि यातून या अग्निविरांचे योगदान राष्ट्र वाढीसाठी कामाला येईल .
जय हिंद…. जय भारत..

– लेखन : मंडलेश्वर काळे
सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त,नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. मा. पंतप्रधानांच्या या घोषणेने युवकांना खूपच छान संधी देशसेवेची, आणि त्याही पेक्षा मोठे जे ,आज युवक भरकटत आहे त्यांना योग्य वळण आणि दिशा मिळेल,त्याच बरोबर योग्य वयात योग्य मोबदला मिळाल्याने जीवनाची योग्य दिशा ठरवून जीवनात शिस्त आणता येईल.
    जयहिंद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version