नमस्कार मंडळी.
बहुप्रतिक्षित पाऊस पडू लागल्याने आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. भीषण पाणी टंचाईचे संकट दूर झाले आहे. माणूस स्वतःला कितीही मोठा समजत असला तरी अजूनही तो निसर्गापेक्षा किती छोटा आहे, हेच अशा अनेक घटना दाखवून देत असतात.
निसर्गात आणि समाजात घडणार्या चांगल्या, वाईट घटनांचे पडसाद आपल्या पोर्टलवर उमटत असतातच. तसे ते गेल्या काही दिवसांत आपल्या पोर्टलवर उमटले आहेत.
वाचू या वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)
1
मा. श्री देवेंद्र भुजबळ सर आणि सौ. अलकाताई यांना स. न. वि. वि.
आपले पोर्टल नेहमीप्रमाणेच दर्जेदार आहे. “शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळा उत्तम” हा लेख अतिशय आवडला. त्यातील मुद्दे योग्य आहेत. 👍👍 श्रद्धेला नाही अंतराची मर्यादा या बद्दल सौ. अलकाताईंचे विचार वास्तववादी आहेत. आदरणीय नीना नहाटा यांची मुलाखत आवडली. रुद्राक्षाची माहिती छान मिळाली. सफर इंग्लंडची, लोखंडी जहाजाची माहिती छान मिळाली.👌👌 जेवण संध्याकाळचे हा सर्वांना पडणारा प्रश्न छान हाताळला आहे. एकंदरीत अंक सुंदर आहे.
— श्रीमती अलका मोहोळकर. पंढरपूर.
2
मुंबई :”पाणी संकटावर कायमस्वरूपी तोडगा” हा सुधीर थोरवे यांचा लेख आत्मचिंतनीय आहे. जल साक्षरता वाढविणे हे येथून पुढील मोठे आव्हान आहे. कळते पण वळत नाही, म्हणूनच पाणी वळणावळणाने समुद्राकडे पळते. समुद्रातील पाणी सौर ऊर्जा वापरून उर्ध्वपतीत करून पिण्यायोग्य बनवल्यास उत्पादन खर्च कमी होऊन निसर्गालाच कामाला लावून निसर्ग संवर्धन होण्यास मदत होईल असे मला वाटते…..🙏💐
— प्रा मनोहर यादव. सातारा.
3
सायकल वाटप कार्यक्रम स्तुत्य
पाण्याचे नियोजन कसे करावे ..यासाठी सांगितलेले मुद्दे बरोबर आहेत …प्रत्येक थेंबाचे संकलन करण्यासाठी आता जुन्या इमारतीमध्ये वॉटर फार्मिंग करण्यासाठी जागा नाही पण नवीन प्रकल्प उभारताना अनिवार्य करायला पाहिजे, तसेच गळती रोखणे, सांडपाणी वापर, तलावांचे पुनर्जीवन,हरित मुंबई…. हे सर्व आधीपासून सरकारने लक्षात ठेवायला नको का ?…..आता नुसता अर्धा तास पाऊस पडला तर काँक्रिट चे रस्ते तुडुंब भरू लागले…लक्षात कोण घेतो ?
बावधन पुणे…येथील काही सोसायट्यांमध्ये आता पिण्याचे फक्त पाणी मिळत आहे ..आता कपडे वगैरे धुणे बंद ..ही परिस्थिती आहे. अजून डोळे उघडले नाही तर कठीण परिस्थिती आहे
डोवर केसल, चॉक खडक वगैरे माहिती आवडली फोटो देखील सुरेख आहेत शेवटची सांगता बाबा आमटे यांची कविता भावली
जहाजाबद्दलची माहिती वाचताना गंमत वाटते. माझे दीर याच क्षेत्रात असल्याने त्यांनी स्वतः तयार केलेले शिप चे मॉडेल ही घरात होते …आम्ही शब्दकोडे करताना हमखास शिप संबंधी मराठी शब्दांवर त्यांची मदत घेत असू .. ताईंनी LASS साठी मराठी शब्द तरुणी केल्याचे बघून मजा वाटली. ताई लिहितात ब्लॅक बॉल किंवा डायमंड मुळे अवस्था कळते …ती कोणती याचेही उदाहरण दिले असते तर आणखी छान झाले असते
बालकाव्य : बेडकाचे लग्न.. छान कविता.
वसुंधरा ताईंच्या .. माई…जबरदस्त खूप आवडल्या.. रसरशीत जगणे, जगणे समजून घेणे, नव्या जगातील नवी ऊर्जा घेत त्याचे स्वागत करणे…एकदम प्रत्ययकारी.
तीन बहिणी छान ..वाचून, फोटो बघून खरेच आनंद होतो ..आपल्या देशातील वैविध्य ..थाळी बघून तर चाटच .. हा हा…केवढ्या वाट्या
पाऊस गाणे ..कविता आवडली
— स्वाती वर्तक. मुंबई
5
उरूळी कांचन येथील निसर्गोपचार केंद्राच्या योग अभियानाचा तपशीलवार वृत्तांत वाचनीय आहे.
योग हा केवळ एक दिवसाचा इव्हेंट न ठरता तो दैनंदिन जीवनक्रमणाचा भाग असावा ही बाब मार्गदर्शक.
किरण आचार्य यांचे “खिडकी” हे सदर अतिशय परिणामकारक आणि वैचारिक आहे.
— प्रा डॉ सतीश शिरसाट. लंडन.
माझी जीवननौका भाग १२ वरील प्रतिक्रिया
वेदवती,
जहाजाची इतकी ‘तपशीलवार’ माहिती अन् ती देखिल ‘Non-जहाजी’😃सामान्य जनांना समजेल अशा शब्दांत लिहिण्याचं तुझं कसब खरोखर वाखाणण्यासारखं आहे. 👌
‘वारयावरची तरुणी’ -हे मराठीकरण आवडलं. 👍
खरोखर ह्या *जल- वाहना* बद्दल अधिकाधिक समजून घेण्यात आमचा रस वाढला आहे त्याचं सगळं श्रेय तुझ्या ह्या मनापासून केलेल्या लेखनाला !
अर्थातच, पुढच्या भागाची प्रतीक्षा वाढलेय.😃
— अनुजा बर्वे.
प्रभा वाडकर यांच्या “आनंदी जीवनासाठी योग” या वृत्तांतावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया…
1
मॅडम,
खूप खूप धन्यवाद. आपण योगासाठी देत असलेले योगदान आम्ही सखी खूप जवळून पाहत आहोत.
तुम्ही आमच्या सुखदुःखात सामील होऊन आम्हांला योग्य मार्गदर्शन करता त्यामुळे योगाचा हा वटवृक्ष दिवसेंदिवस मोठा होत आहे. तुमच्या सोबतचे फोटो पाहून सगळे नातेवाईक, ऑफिसमधील सहकारी आपले कौतुक करतात धन्यवाद मॅडमजी 🌹🌹🙏❤️🙏🌹🌹
— सुजाता साबळे. रोडपाली
2
सुंदर विचार आणि सुंदर लेखन 👍🙏
— कल्पना राऊत. रोडपाली
3
खूप छान. अशाच आमच्या सानिध्यात राहून मार्गदर्शन करा. त्यामुळे सर्व मैत्रिणीची शारिरीक, मानसिक आणि सामाजिक प्रगती होत राहिलं. धन्यवाद
— जयश्री जवळकर. रोडपाली
4
योगावरील लेख अतिशय छान आणि अभ्यासपूर्ण आहे.
— शुभांगी गान. ठाणे
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
