Home लेख वाचनाची भूक भागली…

वाचनाची भूक भागली…

0
Online news on a smartphone and laptop. (Mockup website). Woman reading news or articles in a mobile phone screen application at home. Newspaper and portal on internet, copy space

बघता बघता न्यूज स्टोरी टुडे वेबपोर्टलला आज तीन वर्ष झाली. अलकाताई आणि देवेनभाऊ यांची अथक मेहनत, चिकाटी या सर्वांच्या पाठीशी आहे. रोज आम्ही उत्सुकतेने वाट बघत असतो की आज काय नवीन वाचायला मिळणार ?

कविता, पुस्तक परिचय, विविध विषयांवरच्या मोठ मोठ्या लोकांच्या मुलाखती, असं एकही क्षेत्र नाही की आपल्या पोर्टल मध्ये त्याचा समावेश नाही आणि अलका ताईंनी त्या त्या विषयाला दिलेले अतिशय साजेसे सूचक, वेधक असे चित्र, फोटो इत्यादी..

अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आम्हाला कितीतरी नवनवीन लेखक, कवि, समाजसेवक ह्यांचे उत्तम दर्जाचे लेखन, मुलाखती, समाज सेवा करताना आलेले अनुभव, प्रवास वर्णनं असे विविध प्रकार वाचायला मिळत आहेत आणि हे सगळं केवळ आणि केवळ तुमच्या दोघांच्या प्रोत्साहनामुळेच शक्य झाले. तुम्ही नेहमीच नाविन्यपूर्ण विषय आम्हाला पोर्टल मधून देत असता आणि देत राहाल.

आमच्यासारख्या कसलेही लिहिण्याचे अनुभव नसतानाही आम्हाला तुम्ही नेहमीच उत्तेजन देत आलात. तुमचं कितीही कौतुक केलं तरी शब्द अपुरे पडतील.

वेबपोर्टलला तीन वर्ष झाल्याच्या निमित्ताने तुम्हाला, आपल्या पोर्टल ला खूप खूप शुभेच्छा आणि उत्तरोत्तर तुम्हाला खूप प्रसिद्धी मिळू दे आणि भरपूर यश लाभो. तुम्हा दोघांचं खूप खूप अभिनंदन !! आणि आम्हाला नेहमीच नवनवीन विषयांवरच लेखन वाचायला मिळो हीच प्रार्थना !

नीता देशपांडे

— लेखन : नीता देशपांडे. पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version