शपथ

0

या मातीचा सुगंध घेऊन,
शुद्ध हवेचा श्वास घेऊन,
सूर्यप्रकाशात न्हाऊन,
राष्ट्र कार्य करावे, मतदान करावे,

खरा विचार मनात करावा,
योग्य उमेदवार निवडावा,
त्याच्या हातून विकास व्हावा,
त्याला भेटुन सांगावे, मतदान करावे,

ज्याला नाही तुमची फिकीर,
त्याची तुम्ही न करा कदर,
जो योग्य तोच, निवडणार,
निर्धाराने हे सांगावे, मतदान करावे,

होईल मग तो विकास खरा,
तुमच्या मताचा, वाढेल तोरा,
प्रदेश, देश प्रगती भरभरा,
हे समजून घ्यावे, मतदान करावे…!!!

हेमंत भिडे

— लेखन : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version