Home सेवा सरकारी प्रसिद्धी माध्यमांमध्ये नोकरीच्या अनेक संधी – देवेंद्र भुजबळ

सरकारी प्रसिद्धी माध्यमांमध्ये नोकरीच्या अनेक संधी – देवेंद्र भुजबळ

1

प्रसार माध्यमांचे खाजगी प्रसार माध्यमे आणि सरकारी प्रसार माध्यमे असे दोन प्रमुख भाग असून खाजगी प्रसार माध्यमांमध्ये युवक युवतींना नोकरीची संधी उपलब्ध आहे, तशीच नोकरीची संधी सरकारी प्रसिद्धी माध्यमांमध्ये देखील उपलब्ध आहे, असे मार्गदर्शन न्यूज स्टोरी टुडे पोर्टल चे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी केले. युवा वर्गात विशेष लोकप्रिय असलेल्या “युवांगण” या यू ट्यूब वाहीनीसाठी त्यांची मुलाखत, वाहिनीच्या विशेष प्रतिनिधी रामेश्वरी आहेर यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

श्री देवेंद्र भुजबळ पुढे म्हणाले की,भारत सरकारच्या अखत्यारीतील प्रसिद्धी माध्यमे; उदा. भारतीय माहिती सेवा, आकाशवाणी, दूरदर्शन, पत्र सूचना कार्यालय अशा अनेक यंत्रणांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे निवड करण्यात येते. तसेच केंद्र सरकारच्या अखत्यारीतील महामंडळे, आयोग इत्यादींसाठी त्या त्या यंत्रणांकडून, महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी खात्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच महामंडळे, महानगरपालिका, आयोग, विद्यापीठे आदींसाठी त्या त्या यंत्रणांकडून निवड प्रक्रिया करण्यात येते असे सांगून काही विद्यापीठांमध्ये आता बारावी नंतरच माध्यम विषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे मात्र प्रसार माध्यमांचे क्षेत्र बाहेरून कितीही ग्लॅमरस दिसत असले तरी वेळ प्रसंगी दिवसरात्र, भूक तहान, सणवार विसरून काम करण्याची तयारी असलेल्या मुलामुलींनीच या क्षेत्राकडे वळावे, असा सल्ला त्यांनी यावेळी बोलताना दिला.

ही संपूर्ण मुलाखत आपण पुढील 👇 लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. मानसिकता बदलली तर जग हात जोडून उभे असते…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version