Home लेख सहजीवन : पॉर्न चे दुष्परिणाम

सहजीवन : पॉर्न चे दुष्परिणाम

0

नाशिक येथील एका सर्वेक्षणानुसार वाढत्या घटस्फोटांचे एक प्रमुख कारण म्हणजे मोबाईल आहे, असे दिसून आले आहे. मोबाईलचा पॉर्न पाहण्यासाठी होत असलेल्या गैरवापराचे यात किती प्रमाण आहे ? ते काही कळू शकले नाही. इतरत्र ही कदाचित अशीच परिस्थिती असेल. या दृष्टीने वाचकांनी पुढील लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवाव्यात व या दबलेल्या प्रश्नावर मनमोकळी चर्चा करावी अशी अपेक्षा आहे.
– संपादक

दुसऱ्याच्या हृदयात जाण्याचा मार्ग पोटातून तर सुखी दाम्पत्य जीवनाचा मार्ग बेडरूम मधून जातो असे म्हणतात. कधीही नवरा आणि बायकोचे भांडण होऊन त्यांच्यात दुरावा निर्माण झाला तर ते भांडण बेडरूम मध्ये मिटविले जाते. त्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो पण सहसा पुरुष ह्यामध्ये पुढाकार घेतात.

पण सेक्स म्हणजेच सहजीवन का ? हा महत्वाचा प्रश्न सुद्धा विचारात घ्यावा लागेल.
आजच्या युगात मोबाईलने सेक्स अगदी चोवीस तास तुमच्यासमोर आणून ठेवला आहे. गूगल क्रोम मध्ये प्रवेश केला की आपली इच्छा नसताना सुद्धा तुमचे लिंग कसे वाढविणार, जास्त वेळ सेक्स कसे कराल ? अशा स्वरूपाच्या जाहिराती दिसू लागतात. नवीन पिढी अशा जाहिरातींमुळे आणि सहज उपलब्ध असलेल्या पॉर्न मुळे सतत त्याचा विचार करीत बसते आणि नको त्या विळख्यात सापडते. पोर्न मध्ये सेक्स चे प्रयोग असतात. पण ते प्रयोग आपल्या वैवाहिक जीवनामध्ये करायचे नसतात ह्याचे भान सुद्धा काहीना राहत नाही.

स्त्री ही पत्नी असली तरी नैसर्गिक संभोगा व्यतिरिक्त इतर काही प्रकार हे कायद्याने गुन्हा आहे ह्याची जाणीव कित्येक लोकांना नाही. तुमची जोडीदार तुमच्या विरुद्ध भा. द. वि. 377 नुसार गुन्हा दाखल करू शकते. अश्या सेक्स मुळे नवरा आणि बायकोच्या नात्यात काही दिवसानी घृणा निर्माण होते. एकमेकां प्रति आदर राहत नाही.
आजकाल सोडचिठ्ठी चे जे महत्वाचे कारण जे असते त्यामागे हा सुद्धा महत्वाचा पैलू आहे.

सेक्स हा विषय अजूनही समाजात मोकळेपणाने चर्चिला जात नाही किंवा आपण ते बोलायला घाबरतो. सेक्स ही क्षणांची क्रिया असते पण खोट्या जाहिराती मुळे कितीतरी तरुण आपली बुद्धी खराब करून घेतात.

माणसाला सेक्स ची गरज़ आहे पण त्याबरोबरच इतर छंद असेल तर व्यक्ती स्वतःला त्यात गुंतवून ठेऊ शकतो. नाहीतर व्यक्ती एकसारखा सेक्सचा विचार करीत राहिला तर सेक्स प्रकृती होण्या ऐवजी विकृति होऊ शकतो. अश्या व्यक्तीने नक्कीच चांगल्या मानसोपचार तद्याला दाखवायला हवे व स्वतःचे सांसारिक जीवन वाचवायला पाहिजे.

हा विषय असा आहे की कित्येक त्यावर बोलायला घाबरत असतात किंवा त्यांना लाज वाटते. पण आपले आयुष्य सुखी करणे आपल्याच हाती आहे. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे म्हणजे आगीतून फुफाट्यात जाणे आहे. आयुष्य सुखी करणे तुमच्या हाती आहे. सुखी संसाराचा मार्ग बेडरूम मधून जातो आणि असे असले तरी त्यास अधिक सुखी कसे करता येईल हे तुमच्या हाती आहे.

– लेखन : किशोर पेटकर. नागपूर, पत्रकार
– संपादन : देवेंद्र भुजबळ.  ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version