Home साहित्य साठीपारचे जीवन

साठीपारचे जीवन

3

(काव्यांजली… काव्य प्रकार)

साठीपारचे जीवन
शांत, निवांत, रिक्त
स्वास्थ्याचे सूक्त
अजमावणे

साठीपारचे जीवन
चंदेरी केसांचे मिरवणे
मनसोक्त जिणे
हवेसे

साठीपारचे जीवन
असती जबाबदाऱ्या संपलेल्या
खस्ता अनुभवलेल्या
आठवणीत

साठीपारचे जीवन
स्वतःला वेळ देण्याचे
छंद जोपासण्याचे
दिवस

स्वछंद जीवन
मिळालेल्या वेळेचे नियोजन
समाजसेवा आयोजन
मनाशी

मागोवा आयुष्याचा
समतोल साधावा पुढचा
सुधारणार चुकीचा
मार्ग

नात्यांना जोपासणे
आवड, निवड, हेका
सर्वांना ऐका
मर्म

म्हातारं वय
हिरव्या मनाचे तुरे
रुणझून नुपूरे
नादमय

कमाई असेपर्यंत
प्रेम, शिस्तीचे संस्कार
नाही बारगळणार
कुटुंब

— रचना : सौ.रोहिणी गंधेवार. अकोला
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

3 COMMENTS

  1. खूप छान वर्णन…साठी पार च्या आयुष्या चे

  2. खूप छान प्रेरणादायी कविता.
    वाक्य ळूप साधे आहेत पण म्हणजे, जीवनाचा सार्थ आहे.
    वय वाढलं म्हणून, त्यावर दोष देण्यापेक्षा,
    स्वतः जगायचं शिकावं लागते.

    अ ब साबळे पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version