Home साहित्य डॉ. सुधीर देवरे यांचा ” ब्लॉगच्या जाळ्यातून जग” लेखसंग्रह प्रकाशित

डॉ. सुधीर देवरे यांचा ” ब्लॉगच्या जाळ्यातून जग” लेखसंग्रह प्रकाशित

1

ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक , भाषा, कला, लोकजीवन, लोकसंस्कृती यांचे अभ्यासक डॉ. सुधीर रा. देवरे यांचा ‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’ हा लेखसंग्रह नुकताच पुण्याच्या ‘दिलीपराज प्रकाशना’तर्फे प्रसिध्द झाला.

2012 पासून ब्लॉगवर लिहिलेल्या एकूण आठ वर्षांतील लेखांपैकी पहिल्या चार वर्षांतील निवडक लेखांचं पुस्तक म्हणजे हा ग्रंथ. पुस्तकात एकशे एकोणावीस लेख समाविष्ट आहेत. पुस्तकातील सर्व छोटेखानी लेखांत साहित्यिक, सांस्कृतिक, भाषिक, कला, लोकजीवन, सामाजिक, वैश्विक, धर्मकारण, राजकारण, समाजकारण,सत्ताकारण, शैक्षणिक, प्रबोधनात्मक, पर्यावरण, साहित्य, लोकसंस्कृती, दहशती, शेती, चरित्र, व्यक्‍तीविशेष, बोलीभाषा, अहिराणी भाषा आदी विविध वैचारिक पडसादांचं‍ स्वतंत्र लेखन अंतर्भूत आहे.

Dr Sudhir Devare

‘डंख व्यालेलं अवकाश’, ‘आदिम तालनं संगीत’, ‘कला आणि संस्कृती: एक समन्वय’, ‘पंख गळून गेले तरी’, ‘अहिराणी लोकपरंपरा’, ‘अहिराणी गोत’, ‘अहिराणी वट्टा’, अहिराणी लोकसंस्कृती’, ‘अहिराणीच्या निमित्ताने: भाषा’, ‘माणूस जेव्हा देव होतो’, ‘सहज उडत राहिलो’, ‘सांस्कृतिक भारत’, ‘माणसं मरायची रांग’, ‘मी गोष्टीत मावत नाही’, ‘टिंब’, ‘आस्वाद: भावलेल्या कवितांचा’ ही डॉ. सुधीर देवरे यांची या आधीची ग्रंथसंपदा आहे.

आतापर्यंत डॉ. देवरे यांच्या कोणत्याच पुस्तकाचे प्रकाशन ठरवून समारंभपूर्वक औपचारिक पध्दतीने झालेले नाही. तीच परंपरा पाळत याही पुस्तकाचे ‘दिलीपराज प्रकाशना’च्या कार्यालयात अनौपचारिकरित्या प्रकाशन करण्यात आले.

– देवेंद्र भुजबळ.9869484800.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version