Home बातम्या अभिनव योग महोत्सव

अभिनव योग महोत्सव

0

आंतरराष्ट्रीय योगदिन २०२५ निमित्त केंद्रीय योग आणि निसर्गोपचार संशोधन परिषद व आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमाने “योग फॉर वन अर्थ, वन हेल्थ” या संकल्पनेवर आधारित अभिनव योग महोत्सवाचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे हा महोत्सव एक महिना चालणार असल्याने त्याचे निश्चितच चांगले परिणाम दिसून येतील, अशी अपेक्षा आहे.

या महोत्सवात शाळा, कारखाने, बँका, पुनर्वसन केंद्रे, ग्रामीण भाग अशा विविध ठिकाणी योग सत्र घेण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास १०,००० पेक्षा अधिक लोकांपर्यंत योग पोहोचल.

या महोत्सवाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात योग शिक्षिका डॉ. भगवती मुखेडकर यांनी ब्रह्मकुमारी सेंटर व मणिभाई पतसंस्था येथे महिलांसाठी योग सत्र घेतले. तसेच मुद्रा व योगावरील ऑनलाइन व्याख्याने घेतली.

योग शिक्षक श्री.जे.जे. वाडेकर यांनी भुलेश्वर, सासवड, सोरतपवाडी, वर्करी शाळा, महात्मा गांधी शाळा, एसआरसी केमिकल्स व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग सत्र घेतले.

श्री. राहुल मेमाणे यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत तसेच विविध शाळांमध्ये योग सत्रे घेतली.

श्री. तुषार जगदाळे यांनी शरीर-मन-श्वास व मुद्रा यावर सामान्य लोकांसाठी व गडचिरोलीतील सर्च फाउंडेशनसाठी ऑनलाइन सत्र घेतले. तसेच धवळेश्वर येथे ट्रेकिंगसह योग सत्र घेतले.

कर्म योग म्हणून श्री. सतीश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या.

डॉ. हर्षिनी यांनी फ्रेंच प्रतिनिधींसाठी विशेष ऑनलाइन योग सत्र घेतले.

समारोपाचा “योग संगम” हा कार्यक्रम सांस्कृतिक आणि आध्यात्मिक रंगांनी भरलेला होता. सूत्रसंचालन डॉ. भगवती यांनी केले, तर श्री. राहुल आणि श्री. तुषार यांनी प्रभावी योग सादरीकरण केले. डॉ. समृद्धी यांनी आभार मानले. संगीत व सांस्कृतिक सादरीकरणाने कार्यक्रमाचा समारोप उत्साहात झाला.

आश्रमाचे संचालक डॉ. अभिषेक देविकर यांनी योग हे सर्वांगीण आरोग्य व सामाजिक ऐक्याचे साधन असल्याचा संदेश दिला. संपूर्ण मोहिमेचे समन्वयन डॉ. समृद्धी यांनी केले. तर डॉ. अमेय, श्री. सतीश व सौ. नीलम आखाडे यांनी संयोजन हाताळले. ही मोहीम समाजाभिमुख योग सशक्तीकरणासाठी एक आदर्श ठरेल, यात काही शंकाच नाही.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version