प्रख्यात चित्रपट लेखक- दिग्दर्शक,फिल्म इन्स्टिटय़ूटचे पदवीधर श्री प्रदीप दीक्षित यांनी लिहिलेल्या आणि न्यूज स्टोरी टुडे ने प्रकाशित केलेल्या मुक्त छंद आणि कवितांचा “टेक 3” हा संग्रह मंगळवार, दि. 26 मे 2026 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता पुणे येथील एरंडवने परिसरातील ‘द बॉक्स 2’ थिएटरमध्ये प्रकाशित होणार आहे.

या मुक्तछंद आणि कविता संग्रहाच्या प्रकाशनानंतर, संग्रहातील काही मुक्त छंद नाट्य रुपात सादर करण्यात येणार आहेत. या नाट्य रुपांतराचे लेखन खुद्द श्री प्रदीप दीक्षित यांनी केले असून दिग्दर्शन भूमिका घोरपडे यांनी केले आहे. तर श्वेता, प्रथमेश, सायली, रमन, चारुता, जय, जान्हवी हे कलाकार नाट्य रुपांतर सादर करणार असून स्वतः कवी प्रदीप दीक्षित हे काही मुक्त छंद सादर करणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नाटककार, श्री सतीश आळेकर, कवी अरुण म्हात्रे, लेखिका मंगला गोडबोले, संपादक श्री देवेंद्र भुजबळ उपस्थित राहणार आहेत.
यावेळचे एक विशेष आकर्षण म्हणजे, यावेळी एक “लकी ड्रॉ” काढण्यात येणार आहे. तसेच 300 रुपये किमतीचे पुस्तक 250 रुपयात मिळणार आहे.
या अनोख्या कार्यक्रमाचे तिकीट थिएटरमध्ये जरी मिळणार असले तरी ऐनवेळी निराशा होऊ नये यासाठी आपण +91 8956595131 या मोबाईल क्रमांकावर फोन बुकींग करणे सोयीचे ठरेल.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800