Home साहित्य तुझं माझं जमेना….

तुझं माझं जमेना….

1

नमस्कार मंडळी.
आपल्या पोर्टल वर “नाती” हे एक सदर आहे. या सदरात आज वर वेगवेगळ्या नाते संबंधांवर अनेक लेखिका, लेखकानी लिहिले आहे. आज मात्र आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका लेकीने लिहिलेली कविता वाचू या. कवयित्रीचे वडील श्री ब.रा. देशपांडे हे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातून उप सचिव म्हणुन निवृत्त झाले असून डोंबिवली येथे राहतात. या उभयतांना न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे लग्नाच्या  वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.
— संपादक

किती वेळा भांडलात;
आठवतही नसेल तुम्हाला
कितीदा अबोला धरलात,
तरीही एकमेकांच्या साथीने;
आजवरचा पल्ला गाठलात.

वादविवाद झाले;
कुरबुरी झाल्या,
पण नात्याच्या चौकटी,
नाही ओलांडल्या.

नात्यांची बांधिलकी;
नेहमीच निभावलीत,
कर्तव्याशी प्रतारणा;
तुम्हाला नाही जमली.

संसाराच्या खेळात;
स्वतःला झोकून दिलेत,
ताळेबंदाच्या जमाखर्चात;
नेहमीच पुरून उरवलेत.

आनंदाच्या भरतीने विसावलात;
दुःखाच्या ओहोटीने नाही खचलात,
आजवरचा प्रवास सचोटीने करून;
नेहमी समाधानी राहिलात.

आजच्या तुमच्या लग्न वाढदिवसानिमित्त;
तुम्हाला  हार्दिक शुभेच्छा,
एकमेकांच्या अखंड साथीने;
सदैव सुखी रहा;
ह्या माझ्याकडून, मनःपूर्वक सदिच्छा !

— रचना : सौ योगिनी पंडित. डोंबिवली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version