Home बातम्या शिल्पा तगलपल्लेवार गंपावार यांना वासवीरत्न पुरस्कार

शिल्पा तगलपल्लेवार गंपावार यांना वासवीरत्न पुरस्कार

1

पुणे येथील आर्य वैश्य युथ सेना ही संस्था दरवर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा वासवीरत्न पुरस्कार देऊन गौरव करीत असते. यंदा हा पुरस्कार केमॅन आयलंडस या देशात गेली १५ वर्षे राहणाऱ्या आणि स्वतःला चित्रकार म्हणून घडविणाऱ्या शिल्पा तगलपल्लेवार गंपावार यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या बरोबर इतर पाच महिलांनाही हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार वितरण पुणे येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नी सौ सपना ताई यांच्या हस्ते झाले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

शिल्पा तगलपल्लेवार गंपावार या केमॅन आयलंडस मधून पुरस्कार घेण्यासाठी येऊ न शकल्याने त्यांच्या वतीने त्यांची भाची दिव्या गंगमवार कोकडवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

हे आत्मचरित्र उल्लेखनीय आहे की, गेल्याच महिन्यात शिल्पा तगलपल्लेवार गंपावार यांनी लिहिलेल्या, देवेंद्र भुजबळ यांनी संपादित केलेल्या आणि न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स ने प्रकाशित केलेल्या “मी शिल्पा.. चंद्रपूर ते केमॅन आयलंड्स” या आत्मचरित्राचे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तर प्रकाशन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा डॉ रवींद्र शोभणे, जेष्ठ लेखक – चित्रपट दिग्दर्शक श्री प्रदीप दीक्षित आणि इतर मान्यवरांच्या हस्ते नागपूर येथे एका शानदार कार्यक्रमात करण्यात आले.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version