Home बातम्या सर्वद स्टार पुरस्कार प्रदान

सर्वद स्टार पुरस्कार प्रदान

0

सर्वद फाउंडेशन, मुंबई महाराष्ट्र आयोजित सर्वद स्टार पुरस्कार समारंभ २०२६ हा कार्यक्रम नुकताच बोरीवली पश्चिम येथील “गर्जतो मराठी” हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मानचिन्ह, सॅश व गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. मोहन सालेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते श्री. अरुण नलावडे तसेच विद्यावाचस्पती डॉ. मिलिंद भोसुरे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून समाजकार्य, संस्कृती संवर्धन, शिक्षण व कला क्षेत्रातील योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन करत त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचा उत्साह वाढवण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात, असे प्रमुख सल्लागार श्री. महादेव रानडे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन डॉ. अंजुषा पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख सल्लागार, श्री. महादेव गोविंद रानडे, डॉ. देशमुख व संचालिका डॉ. सुचिता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

समारंभास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. संपूर्ण कार्यक्रम आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version