Home साहित्य अग्नीशिखा

अग्नीशिखा

0

षडाक्षरी रचना
पळस फुलला

झाली पानगळ
शुष्क भासे रान
फुलला पळस
रानामधे छान….१

नसेना का पान
असो किती उन
पळस बहरे
असाच आंतून…२

हिरवी करडी
मऊसूत पानं
वृक्षावर झुले
म्हणतात गाणं…३

पक्षांची घरटी
अंगाखांद्यावर
वाटसरू थांबे
जरा घडीभर….४

औषधीचे गुण
नाही कमी त्यात
क्लोरोफिल असे
हिरव्या पानात…५

तळपत्या नभी
केशराच्या ज्वाला
जरी अग्निशिखा
रंगात रंगला….६

पळस शिकवी
जगण्याचं भान
सोसायचं ऊन
बहरावे छान…७

— रचना : अरुणा दुद्दलवार
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version