Home साहित्य अबला नव्हे, सबला

अबला नव्हे, सबला

1

कळेना हे नित्य
असे कां घडे !
का निघतात
तिच्या अब्रूचे धिंडवडे ?

स्त्रियांनो, नका समजू स्वतःला हीन, दीन,
नका समजू स्वतःला शापित
स्त्रीत्व, शाप नसून आहे वरदान

तुम्हीच तोडा त्या लांडग्यांचे लचके,
देऊ दे त्यांच्या “मर्दानगीला” आचके,
आली आहे वेळ,
बना त्यांचा कर्दनकाळ

होऊ दे तुमची युति,
भले ह्या लढ्यात पडो आहुती,
छाटून द्या पंख दुबळेपणाचे,
ओळखा तुमच्या
पंखातील गरुडाचे बळ

राणी लक्ष्मीबाई समोर जरी शत्रूचा गराडा,
एकटीच्या हिंमती वर शिकविला धडा

घ्या शपथ !
“मुर्दाडा, तुलाच नपुंसक सिद्ध करीन !
माझ्या अब्रूचे मीच रक्षण करीन !”

सुलभा गुप्ते

— रचना : सुलभा गुप्ते. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. महिलांना आत्मभान आणि विश्वास देणारी सुरेख रचना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version