Home साहित्य अभंग : भूतली वैकुंठ

अभंग : भूतली वैकुंठ

0

साकव्य विकास मंच ने अभंग लेखन स्पर्धा आयोजित केली होती. एकूण ४०८ स्पर्धक सहभागी झालेल्या या स्पर्धेत ज्योत्स्ना तानवडे यांच्या अभंगाला सर्वोत्कृष्ट (विभागून) सन्मान प्राप्त झाला आहे.हा अभंग पुढे देत आहे.
ज्योत्स्ना तानवडे यांचे मन:पूर्वक अभिनंदन.

🙏भूतली वैकुंठ 🙏
वैकुंठ पंढरी | आषाढीची वारी |
भावे नेम करी | दर साल || १ ||

वाट पंढरीची | ओढ विठ्ठलाची |
साथ भाविकांची | मेळा चाले || २ ||

श्रद्धेचा मृदुंग | मनाचा अभंग |
संकीर्तनी दंग | नाम घेई || ३ ||

देहबुद्धी सोडी | लोभ माया तोडी |
अभंगाची गोडी | मना जडे || ४ ||

रिंगण जन्मांचे | धावणे मनाचे |
चंदन भक्तीचे | लावियले || ५ ||

वारीतले क्षण | जीवन शिक्षण |
संत शिकवण | मनी ठसे || ६ ||

पूर्व सुकृताची | वारी पंढरीची |
ध्वजा वैष्णवांची | फडकते || ७ ||

ज्योत्स्ना तानवडे

– रचना : ज्योत्स्ना तानवडे. वारजे, पुणे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version