Home साहित्य अरिहंत

अरिहंत

0

अहिंसा परमो धर्म:
सद्विचार मनी रुजे
करुणेच्या आसवां
महत्व प्रेमात भिजे

नश्वर इथले सगळे
का करी माझेमाझे
संग्रहाच्या निग्रहांत
अनावश्यकतेओझे

परोपकारार्थ जन्मो
साठवूनि ठेवी उर्जे
उपवासे बलवान रे
शरिराचेसगळे पुर्जे

अपरिग्रहचा आग्रह
जरुर जीवना काजे
तितुका शिधापुरेसा
जे आवश्यक गरजे

मोक्ष पथार्थ प्रयाण
जाण ते समर्थ राजे
नीतळ आत्म्यासुखे
प्रभू निश्चित विराजे

शांतीचे महत्वसत्व
डंकात्रिलोकी गाजे
सेवकश्रावक बनून
खुले मुक्ती दरवाजे

हव्यास क्रुर असूया
अपेक्षा काहूर माजे
हुरहूर लागे कशाला
जे कधी नव्हतेमाझे

आंतरिक जयमिळो
कुकर्म स्पर्शता धजे
देती केवलीआशिष
सुचित्र शोभते ध्वजे

हेमंत मुसरीफ

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version