Home साहित्य उपेक्षितांचे जीवन

उपेक्षितांचे जीवन

0

उपेक्षितांचे जीवन
दीन दुबळ्यांचे मरण
करावे भरण पोषण
त्यात कुणी करती शोषण

वितभर पोटासाठी
गावोगावी भटकंती
महागाई भस्मासूर
हाती मिळे नच अंती

अल्प पैशात परिवार
पोसावा प्रश्न उद्भवती
शैक्षणिक गरजा अमाप
समस्या अवतीभवती

शिक्षणाचा होई खेळ
नोकरी समस्या फार
युवकांची त्रेधातिरपीट
कुठेही मिळे न आधार

नोकरी कशीबशी पदरी
शोषती सोळा अठरा तास
कुटुंबाची अवघड समस्या
परिवार होतसे उदास

अतिशय कठीण काळी
घेती सुट्टी क्षणभर
अल्पशा पगारात शेठ
पैसा कापती वरचेवर

पावसाचा महा अभाव
दैन्यावस्था गरिबात
कृषकाच्या नशीबी दुःख
आत्मसमर्पण होई त्यात

अपेक्षितांचे जीवन झाले
मुश्किल जटील समस्या
उलगडा होईना क्षणात
जणू आयुष्यात अमावस्या

शोभा कोठावदे

— रचना : शोभा कोठावदे. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version