Home साहित्य अशीही माणसं…

अशीही माणसं…

4

स्पर्धेच्या या युगात पळतात ही माणसं
सुखासीन जगणाऱ्यांना छळतात ही माणसं

न्यायनीतीच्या गप्पा हमखास मारणारे
वासनेची शिकार शोधतात ही माणसं

परस्त्री मातेसमान शिकवण असे आमुची
तरीही बलात्काराकडे झुकतात ही माणसं

एकविसाव्या शतकात विसावा कसा आटला
समाधानासाठी कशी धडपडतात ही माणसं

सोशल मिडीयाच व्यसन हे सुटता सुटेना
आपलेपणाला मग दूरावतात ही माणसं

जाती धर्माच्या द्वेषानं पेटतो कधी वणवा
सूडाच्या आगीत कशी जळतात ही माणसं

ज्यांच्यावर होता भरवसा ते साथ सोडून गेले
संकटकाळी खरे कळतात ही माणसं

चंद्रशेखर धर्माधिकारी

– रचना : चंद्रशेखर धर्माधिकारी. वारजे, पुणे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

4 COMMENTS

  1. आपलेपणाला मग दुरावतात ही माणसं……खरंच आजची परिस्थिती मांडली आहे… कविता नेहमी प्रमाणे अर्थ पुर्ण आणि मनात जागा करणारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version