Home साहित्य _वात्रटिका_

_वात्रटिका_

0

मुलाखत यमराजाची

एकदा धाडसाने यमाची मुलाखत घ्यायचे ठरवले
घाबरू नका, माझे दिस अजून नाही भरले !

भेटल्या भेटल्या त्याने शानदार स्वागत केले, 
“गजाभाऊ, आमच्या भेटीचे कसे काय मनात आले ?”

पहिला प्रश्न केला,
“कामाचा लोड वाढलाय का ? 
कुणालाही उचलता,
दर्जा घसरलाय का ? 

शाळेत जाणारी मुले,
गटारात पडणारी माणसे,
खराब रस्त्यावरील अपघात.. 
काय चाललंय ?”

दुध, पनीर, पेढ्यामध्ये भेसळ,
रुग्ण किती वाढले ?
बघ जरा पापांचा महापूर,
सामान्य जनतेने विचारायला मज धाडले !

यमराज उत्तरला, “नेते-अधिकाऱ्यांना,
भेसळखोरांना काम आउटसोर्स केलंय ! 

टक्केवारी वाढलीय लाचखोरीच्या दरात,
एकटा मी काय करणार ? 
अशीच माणसे मरणार !

राग येऊन म्हणालो, 
“मग खाणाऱ्यांचा करून टाक गेम ! 
त्यांना आता उरली नाही जनाची-मनाची शेम !”

मुलाखत आटोपताना मुलाखत म्हणाला
“सबका नंबर आयेगा ! 
तडपातडपाकर खास लॉट मे सब ले जायेगा !”

— वात्रटिकाकार : गजाभाऊ लोखंडे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version