Home बातम्या असेही अभिनव पुस्तक

असेही अभिनव पुस्तक

0

जगभरातील कोरोनाच्या कहरामुळे गेले संपूर्ण वर्ष आणि हे ही वर्ष नकारात्मक आहे. पण नकारात्मक गोष्टी घडतं असतानाच एक उत्तम काम दररोज होत होते, ते ही न चुकता सलगपणे ३६५ दिवस !

चांगुलपणाच्या चळवळी मार्फत वर्षभर माणुसकीचा धबधबा वेबिनार रुपात  सलग वाहत होता आणि त्याचे मार्गदर्शन करत होते डॉ ज्ञानेश्वर मुळे सर. भारत देशाचे माजी परराष्ट्र सचिव आणि मानवाधिकार आयोगाचे विद्यमान सदस्य.

डॉ. ज्ञानेश्वर मुळे.

दररोज दुपारी पाच वाजले की यशवंत शितोळे आणि प्रणिती शितोळे यांनी माणुसकीला माणसे जोडली आणि आधार निर्माण केला.

यशवंत शिंतोळे.

विविध क्षेत्रातील काम करणार्‍या मान्यवर, कर्तृत्ववान आणि समजाला योगदान देणाऱ्या नामांकित व्यक्ती यांची मुलाखत यशवंत शितोळे, प्रणित शितोळे यांनी दररोज फेसबुक पेज, चांगुलपणाची चळवळ याद्वारे घेतली आणि आरंभशूर ते समर्पित  काम यातील फरक समजाला दाखवून दिला.

नुकतेच, १५ मे रोजी या कार्यक्रमास एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, कोल्हापूर कण्हेरी मठ येथील काडसिद्धेश्वर स्वामी, तंजावर येथील भोसले राजघराण्याचे वंशज यांच्याहस्ते या संवाद मालिकेतील मुलाखतींचे क्यु आर कोड असणारे पुस्तक प्रकाशित झाले.

विविध क्षेत्रातील ३६५ मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने पार पडला.
चांगुलपणाची चळवळ कोरोना विषाणूशी लढा देत आदरणीय डॉ मुळे सर यांच्या उपस्थितीत दमदारपणे पावले टाकत आहे हे या निमित्ताने दिसून आले, हे निश्चित.

कमल अशोक

– लेखन : कमल अशोक, दिल्ली.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version