Home बातम्या डॉ. प्रतिभा जाधव यांची नियुक्ती

डॉ. प्रतिभा जाधव यांची नियुक्ती

0

महाराष्ट्र शासनाच्या एकल पाल्य योजना समितीवर सदस्य म्हणून प्रा डॉ. प्रतिभा जाधव यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल जाधव मॅडम यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन.

अल्प परिचय : प्रा डॉ. प्रतिभा जाधव या सध्या नाशिक जिल्ह्य़ातील लासलगाव येथील वरिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख आहेत. लेखिका आणि प्रभावी वक्त्या म्हणुन त्या ओळखल्या जातात. या बरोबरच त्या एकल महिलांचे पुनर्वसन, सक्षमीकरण आणि न्यायासाठी सातत्याने कार्य करीत आहेत. कोरोना काळातील एकल महिलांच्या वास्तव जीवनावर आधारित त्यांचा ‘दहा महिन्यांचा संसार’ हा कथासंग्रह विशेष गाजला असून, या पुस्तकाला अनेक प्रतिष्ठित साहित्य पुरस्कार मिळाले आहेत. या कथासंग्रहाचा ‘Untold Stories of Covid-19’ या नावाने इंग्रजी अनुवादही ऑथर्स प्रेस, नवी दिल्ली यांनी प्रकाशित केला आहे.

डॉ. जाधव विविध नामांकित वृत्तपत्रांत सामाजिक आणि वैचारिक विषयांवर नियमितपणे लेखन करीत असतात. त्या ‘साहित्यसखी महिला साहित्यिक मंच’ च्या संस्थापक अध्यक्षा ही आहेत.या नियुक्तीबद्दल त्यांचे विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन केले असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version