Home साहित्य आतंकवाद मुर्दाबाद

आतंकवाद मुर्दाबाद

1

पुलवामाच्या जखमेवरची
खपली आज पुन्हा भळभळली
काश्मीरमध्ये दहशतवादी
बंदूक कशी ही धडधडली

भूलोकीच्या नंदनवनात
गेले होते फिरावयाला
कसा नशीबी आला त्यांच्या
दहशतवादी भयाण हल्ला

देश आपला, राष्ट्र आपले
सीमा रेषा म्हणती सुरक्षित
तरी कसे हे घुसती आणिक
ठार मारती निष्पाप अगणित

पर्यटकांचा नाहक बळी हा
आले होते फिरावयाला
लग्नानंतरच्या मधुचंद्राचा
किती भयानक अंत जाहला

पाकिस्तानी कुरापतींना
किती सहावे सांगा आपण
रग जिरवण्या त्या षंढांची
उत्तर आहे फक्त आक्रमण

— रचना : सुरेश शेठ. कोथरूड, पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version