Home साहित्य “आयुष्या ओळख तुझी नि माझी”

“आयुष्या ओळख तुझी नि माझी”

0

आयुष्या तुला मी न्याहाळू कसा रे !
आयुष्या तुला मी सांग पाहू कसा रे !

दिसतोस जसा तू नाहीस तसा रे !
कसा बोलतोस तू तुझे रुप न्यारे !

होशील कधी तू स्थिरचित्त जीवनी !
जाण व्यथा माझी तू, तुझ्या मन्मनी

कधी लाभेल मज किनारा हा सुखाचा
आयुष्य ओघळते रे!ना भरवसा कुणाचा

तृषा, कामना मन्मनीची जाळते मनाला
तूही तसा!न जाणतो कुणी या हृदयाला

वागणे तुझे असे कसे ! सांग जीवनी मला रे !
त्यास्तव जीवनी कुणी नीट न बोलती मला रे !

ओळख तुझी नि माझी कळू दे जगाला रे !
चेहरा तेजस्वी आपला मग दिसेल जगाला रे !

— रचना : मधुकर निलेगावकर. पुणे
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version