Home साहित्य आयुष्य खूप सुंदर आहे

आयुष्य खूप सुंदर आहे

0

कधीतरी ती गोष्ट घडणार आहे.
कुणीतरी आधी, कुणीतरी नंतर,
कुणीतरी एकटे राहणार आहे.
मनाचाच आधार रहाणार आहे,
विचारांचा व्यायाम चालू आहे,
आणि सौंदर्याचा शोध चालू आहे.
आयुष्य खूप सुंदर आहे !

जीवनाची लढाई चालू आहे,
सुखदुःखाची बढाई चालू आहे.
एक एक दिवस ढळतो आहे,
बेरीज वजाबाकी चालू आहे.
बाकी शून्यावर यायची आहे,
त्याचीच धडपड चालू आहे.
आयुष्य खूप सुंदर आहे !

आयुष्याचा विचार करतो आहे,
विचारांचा संघर्ष चालू आहे.
शरीराचा असहकार चालू आहे,
उपचारांचा भडीमार चालू आहे.
सुहृदांचे सहकार्य चालू आहे,
यापेक्षा अजून काय हवं आहे ?
आयुष्य खूप सुंदर आहे !

सुनील देशपांडे

— रचना : सुनील देशपांडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version