Home साहित्य आला पाऊस पाऊस

आला पाऊस पाऊस

1

आला पाऊस पाऊस
हलकासा शिडकावा

जणुं टिचकी मारुन
देई मातीस सांगावा….

आला पाऊस पाऊस
रिमझिम बरसला

वेस प्रियेच्या गावाची
ओलांडून तो पातला

आला पाऊस पाऊस
असा विरही व्याकुळ

प्रियतमेच्या भेटीसी
झाला आतुर आकुळ

आला पाऊस पाऊस
आतां सरींवरी सरी

हुरहुर ती जीवाची
भरे अंगण ओसरी

आला पाऊस पाऊस
होऊनिया वेडापिसा

धुंवाधार बरसूनि
चुंबी प्रियेस धुंदसा

आला पाऊस पाऊस
सततची लागे धार

गाठ जीवाची शिवाशी
मस्त लागलीसे तार

आला पाऊस पाऊस
करी वर्षाव धारांचा

रंगे सोहळा तो पुन्हां
जीवा शिवाच्या भेटीचा

आला पाऊस पाऊस
गुंगुनिया झाला मंद

सुप्रियेच्या अंगावरी
तृप्तीचे ग ओले थेंब

स्वाती दामले

— रचना : स्वाती दामले.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. I wait for every new edition of NewsStory, as there are live interviews and wonderful experiences shared by people who have done great work, sometimes anonymous to the world.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version