Home साहित्य रक्तदान

रक्तदान

0

जागतिक रक्तदान दिन नुकताच होऊन गेला. त्या निमित्त रक्तदानाचे महत्व सांगणारी ही कविता…
– संपादक

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान
रक्तदानाने वाचेल एखाद्याचा
प्राण,माणुसकी आहे त्यात
रक्तदान हेच श्रेष्ठ दान

अचानक अपघात घडता
होतो फारच रक्तस्त्राव
जरुरी भासते तत्पर रक्ताची
तरुणाईने पुढे येत भरावा घाव

योग्य रक्तगट अभावी कधी अडते
करावी लागते बरीच धावाधाव
अचूक रक्त मिळता होई आनंद
त्याच्या रुपात जणू भेटतो देव

रक्ताचा रंग आहे एकच लाल
नाही हिरवा भगवा पिवळा
जात धर्म उच्च निचता नको तत्व
जगण्यासाठी रक्ताचे आहे महत्व

सेवाभावी संस्था घेती शिबीरे
रक्तदानाचे महत्व सांगती पटवून
रक्तदान करण्या देती प्रोत्साहन
जनजागृतीतून होते हो प्रबोधन

निरोगी निरामय व्यक्तीने
करावे रक्तदान नियमित
आहार विहार व्यायामाने
शरीर येईल भरुन राहाल तंदुरुस्त

रक्तदान आहे एक पुण्यकर्म
दिल्याने भरभरुन पाहा वाढेल
रक्तदानाने मिळेल प्राणदान
रक्तदानातून मिळेल समाधान…

डाॅ. प्रभा वाडकर

— रचना : प्रभा वाडकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version