Home साहित्य आली दीपावली

आली दीपावली

0

आली दीपावली
निलपर्णी क्षितिजावरी
नक्षत्रमाळा झळकती अंबरी
घातल्या पायघड्या रांगोळ्यांच्या

धुक्यातूनी डोकावला सूर्यनारायण
जनमनाचा अंधार कराया दूरी
हाती विजयाची पताका
प्रेम, शांतीचे दीप झळकती मनी

आली दीपावली
धनधान्याची पखरण
करी बळीराजाच्या दारी
आली सोनपावलानी लक्ष्मी घरोघरी

तेजाच्या वर्षावात
स्वर्ग आला धरेवरी
ओवाळते राम-लक्ष्मण-सीतेला
लक्ष दीप लखलखती

आज दीपावली दीपावली
ये गं सखे, ब्रम्हरसबरसत
प्रत्येकाच्या दारी

— रचना : अंजली सामंत. डहाणू
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version