Home साहित्य ऋतुराज वसंत

ऋतुराज वसंत

1

वसंत ऋतूच्या आगमनाने
तनमन अवघे ग मोहोरते
पर्ण पाचूचा शालू नेसूनी
वसुंधरा नटूनी सजधजते..

पूर्ण सतेज पर्ण पालवीने
लता वेल फुलूनी झुकते
फुलांची शाल पांघरूनी
वसंतआगमने धरा हसते..

तरुलता हर्षे बहरुनी येता
पक्षी किलबिल गातसे मोदे
चिवचिवाट कानी पडता
वसंत ऋतूची चाहूल होते..

सप्तरंग उधळण करूनी
चित्त उल्हासे गे आनंदाने
सोनपाऊले प्रभा उगवते
कोकिळ मधुर कुजनाने..

आकांक्षाचा वेल उंच दावुनी
जिव्हा आस्वादे, तृप्त होऊनी
ऊर्जेने शिखरं सर करू या
वसंतोत्सव साजरा करू या.

मीना घोडविंदे

— रचना : सौ मीना घोडविंदे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. मीनाताई, वसंतोत्सव खूप सुंदर फुलला आहे. सुंदर काव्य रचना 🙏💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version