साहित्य एकांत By NST Team - May 27, 2022 1 Share FacebookXPinterestWhatsAppPrintTelegram असा एकांताचा पक्षी घुमे मनी निरंतर चराचर एक होई मिळे धरा नी अंबर। दूर उगवे पहाट लाल क्षितिजाशी गोळा भेटे पूर्वेच्या नक्षीला सूर्यसखा हा वेल्हाळा। मन विजनाशी भेटे असा मधुर एकांत जिवा शिवाचे हे नाते मन उदार अनंत। अनुपमा मुंजे – रचना : अनुपमा मुंजे.
🌹सुंदर कविता 🌹
अशोक साबळे
अंबरनाथ