Home बातम्या एक सेल्फी पर्यावरणासाठी !

एक सेल्फी पर्यावरणासाठी !

0

कुटुंबीय, मित्र, मैत्रिणीसोबत आपण नेहमीच सेल्फी काढतो. पण आता तुम्ही एक रोप लावायचं आणि त्याच्यासोबत सेल्फी काढून पाठवायचा आहे. तुम्ही पाठविलेला सेल्फी राज्यस्तरावर प्रसिद्ध केला जाईल. ही नवी भन्नाट आणि अभिनव कल्पना लढवून लोकांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी उभं करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.‌
आपला सेल्फी 9623237135 या व्हॉट्सॲप नंबर वर अंतिम दिनांक 25 जून 2026 पर्यंत पाठवायचा आहे.

ही स्पर्धा नि:शुल्क असून सर्वांसाठी खुली आहे. सेल्फी किंवा फोटो सोबत संपूर्ण नाव, वय, संपूर्ण पत्ता, कोणते झाड लावले ? त्याचे नाव, इ माहिती पण पाठवावी.

पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढत असलेलं तापमान, कमी होणारं पर्जन्यमान, रुसलेला वरुणराजा आणि आग ओकणारा सूर्य.. या सर्व समस्यांवर वृक्षारोपण हाच एकमेव उपाय आहे.

लोकांना झाडं लावण्यासाठी उद्युक्त करणे हाच या मोहिमेचा उद्देश आहे. तसेच झाडाबरोबरच पर्यावरण जनजागृती व संवर्धनाचा हेतू असून निसर्ग वाचवण्यासाठी एक निकोप स्पर्धा घडवून आणणे. प्रत्येक माणसाच्या मनात झाडं लावण्याचा विचार रुजवण्याचा हा एक प्रयत्न असल्यामुळे या स्पर्धेत राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक यांनी उत्फुर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन मातृसेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा संध्या सामंत सावंत, ठाणे आणि शिक्षक ध्येयचे मधुकर घायदार, यांनी केले आहे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version