Home साहित्य एबीसीडी कि बाराखडी ?

एबीसीडी कि बाराखडी ?

39

ए बी सी डी पाठ झाली
डोळाआड बाराखडी
इंग्रजांच्या कॉन्व्हेंट मुळे
करी झाली आंबट कढी ।। १ ॥

खरे आहे म्हणता म्हणता
सगळेच होते शुअर
इंग्रजीच्या ज्ञानापुढे
मायबोली झाली पुअर ॥ २ ॥

हाय हॅलो सोबत्यांना
इतरांना गुड मॉर्निग
राम राम नमस्काराला
अडाणी म्हणुन लास्ट वॉर्निंग ॥ 3॥

प्रभातफेरी की मॉर्निंग वॉक
सहजगप्पा की कॅज्युअल टॉक
आनंदात रोल अँड रॉक
बघुनी आश्चर्याने लिपलॉक ॥ ४ ॥

रेन रेन गो अवे खरे आहे
माझे मडके पण गेले अवे
येरे येरे पावसा नको म्हणु
म्हण रिंगा रिंगा त्यांच्यासवे ॥ ५ ॥

स्कुल कॉलेज झाल्यावर
बघा आता नोकरी पाणी
ऑफीसमधील बॉस म्हणतो
सोडा इंग्रजी सुधारा वाणी ॥ ६ ॥

मायबोली स्कुलमधलेच
फक्त झाले ऑफीसर
कॉन्व्हेंट स्कुलला नाही येणार
मायबोलीच्या बुद्धीची सर ॥ ७ ॥

सुजाता येवले

– रचना : सुजाता येवले
– संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

39 COMMENTS

  1. खूपच छान रचना केली मराठी राजभाषा दिना निमित्त मराठी भाषेचा जयजय कार

  2. हास्यशैलीतील तुलनात्मक रचना छान!

  3. खूपच छान रचना केली येत्या मराठी राजभाषा दिना निमित्त मराठीचा जय जय कार

  4. खूपच छान सुजाता रचना.. विनोदी अंगाने छान कान पिचकी‌ दिलीस.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version