औषध

0

पोलीस वर्दीतील व्यक्ती ही किती संवेदनशील असू शकते, याचे उदाहरण म्हणजे निवृत्त पोलीस उपअधिक्षक सुरेखा दुग्गे मॅडम होत.
त्यांची ही कविता आपल्याला नक्कीच अंतर्मुख करेल.

दुग्गे मॅडम यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे.
– संपादक

बसली होती एक माता
रस्त्याच्या कडेला थकून
पहात होती औषधांच्या
दुकानात टक लावून

गर्दी होती दुकानात
एकदमच दाट
बघत होती ती गर्दी
ओसरण्याची वाट

होती तिच्या हातात
चुरगळलेली चिट्ठी
म्हणून आला सेल्समन
विचारण्या साठी

वाचून तिच्या हातातील
परदेशातल्या लेकाचं पत्र
भरून आलं त्याला
वाटलं एकदम विचित्र

विचारले मग त्याने
काय हवंय तुम्हाला
गहिवरून म्हणाली ती
औषध देतो का मला ?

कसल औषध पाहिजे ?
तो तिला म्हणाला
म्हणाली ती हवं मला औषध
विसरायचं मुलाला

आपल्यामुळे पालकांच्या
डोळ्या अश्रू असले पाप
ईश्वरपण नाही करणार
तुम्हाला कधीही माफ

सुरेखा दुग्गे

– रचना : सुरेखा दुग्गे
निवृत्त पोलीस उप अधीक्षक. मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version