कल्याण (पश्चिम) येथील रोनक सिटी, सेक्टर-२ गार्डनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे श्री. रितेश फडके, अध्यक्ष, रोनक सिटी फेडरेशन यांचे रोनक सिटी सेक्टर-२च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन व शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले. त्यानंतर योग मार्गदर्शक सौ. रिंकू बाळू आव्हाड तसेच योग सादरीकरणासाठी उपस्थित सर्व सहभागींचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी योग मार्गदर्शक सौ. रिंकू बाळू आव्हाड यांनी आपल्या दैनंदिन जीवनात योगाचे असलेले महत्त्व तसेच योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. योग हा निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनशैलीचा पाया असल्याचे त्यांनी उपस्थितांना पटवून दिले.

त्यानंतर योग सादरीकरणास सुरुवात झाली. वय वर्षे ३ पासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सौ. रिंकू बाळू आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताच्या तालावर विविध योगासने तसेच काठी योगाचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले. मंत्रोच्चारांसह सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, भ्रामरी प्राणायाम, मस्तकासन, अनुलोम-विलोम आणि इतर विविध योगप्रकारांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. उपस्थितांनी या सादरीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद देत योगाचा आनंद अनुभवला.
सदर कार्यक्रमात सुमारे ५० ते ६० नागरिकांनी सहभाग घेऊन योगाबद्दलची जागरूकता आणि उत्साह व्यक्त केला. लहान मुले, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटातील नागरिकांचा सहभाग कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी सौ. योजना नरेश पाटील यांनी उत्कृष्टरीत्या केले.
कार्यक्रमाच्या शेवटी रोनक सिटी फेडरेशनचे पदाधिकारी, आयोजक तसेच योग सादरीकरणात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानून आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800