Home साहित्य कवीची व्यथा

कवीची व्यथा

1

सांगतो तुम्हा मी कवीची व्यथा,
रुसते कधी कधी माझी कविता.
खरं तर तिचाही हक्क आहे म्हणा,
कारण मीच तिचा कर्ता करविता..!! १ !!

मीच तिलाही जन्माला घालतो,
छान छान संस्कार तेही करतो.
अनेक पुस्तकांची पाने चाळतो,
एक एक शब्दांचा घास भरतो..!! २ !!

देतो भरजरी भावनांचे अलंकार,
तेव्हाच दिसते खुलून शोभिवंत.
जशी जशी वयाने वाढत जाते,
तिलाच वाटायला लागते खंत..!! ३ !!

वाचकांच्या नजरेत ती भरते,
तसे कौतुकही सारे करतात.
पण माझे बाकी दुर्लक्ष होते,
दुःखी ती बघून डोळे भरतात..!! ४ !!

इतका कां मी कसा होतो क्रूर,
भावनेच्या भरात मी जातो दूर.
तिच्याकडे ढुंकूनही बघत नाही,
तेव्हाही गंगा जमुनेला येतो पूर..!! ५ !!

रोज एक कविता येते जन्माला,
जुन्या कवितेला विसरून जातो.
जाणीव जेव्हा मला याची होते,
कां माझ्याच मनाला मीच खातो..!! ६ !!

— रचना : सुभाष कासार.. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. कवीची व्यथा छान मांडली कवितेतून सुभाष सर👌👌

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version