Home बातम्या कवी दिपक सोनवणे सन्मानित

कवी दिपक सोनवणे सन्मानित

0

श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालय, लोकमान्य सेवा संघ, पारले, मुंबई या संस्थेतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठित कै. मोरेश्वर पटवर्धन नव काव्यसंग्रह पुरस्कार एका दिमाखदार सोहळ्यात ठाण्यातील युवा कवी दिपक सोनवणे उर्फ कवीदिप यांना त्यांच्या “६३ बेधडक” या काव्यसंग्रहासाठी प्रसिद्ध गीतकार, संगीतकार, लेखक, कवी आणि चित्रकार श्री. मिलिंद जोशी यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला साहित्यप्रेमी, कवी, मान्यवरांसह कै. मोरेश्वर पटवर्धन यांच्या परिवारातील सदस्य आणि परीक्षक शिक्षिका सौ. पेठे मॅडम उपस्थित होत्या.

कवी दिपक सोनवणे यांच्या काव्यातील संवेदनशीलता, भाषेची समृद्धी आणि बेधडकपणा यांची प्रशंसा निवड समितीने केली. पुरस्कार स्वरूपात रोख रक्कम, सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. शिक्षिका सौ. लिमये मॅडम यांनी सूत्रसंचालन केले. श्री अतुल गोखले, कार्यवाह, श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालय यांनी कै. मोरेश्वर पटवर्धन यांच्या साहित्यिक योगदानाची आठवण करून दिली. तसेच मुख्य अतिथी श्री. मिलिंद जोशी यांनी पुरस्कार प्रदान करताना सोनवणे यांच्या साहित्यिक प्रवासाचा गौरव केला आणि काव्यसंग्रहातील बेधडक शैली आणि वैचारिक खोलीवर प्रकाश टाकला.

शेवटी श्री. अतुल गोखले यांनी उपस्थितांचे आणि विशेषतः कै. मोरेश्वर पटवर्धन यांच्या परिवारातील सदस्य, सौ. पेठे मॅडम, सौ. लिमये मॅडम तसेच सर्व सहभागींचे आभार मानले.

हा सोहळा नवोदित कवींसाठी प्रेरणादायी ठरला असून, मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version