Home सेवा काश्मिर हल्ला : मन विषण्ण झालं

काश्मिर हल्ला : मन विषण्ण झालं

0

नमस्कार मंडळी.
मी माझ्या दैनंदिनीत रोज विशेष नोंदी करीत असतो. पण पहलगाम येथील भ्याड हल्ल्यात अतिरेक्यांनी ज्या अमानुषपणे निष्पाप पर्यटकांची हत्या केली, तर त्या नोंदी करताना माझा हात सारखा थरथरत होता. मन विषन्न झालं होतं. त्या पर्यटकांना त्या अतिरेक्यांनी त्यांचा धर्म विचारला. त्यांना इस्लाम मधील कलमा म्हणायला लावल्या.
या साऱ्या घटनांनी माझ्या मनाचा भयंकर उद्रेक झाला आहे. मनात विचार यायला लागले की, आमचे सरकार, आमची गुप्तचर यंत्रणा नक्की काय करते ? पर्यटक जिथे जातात तिथे काही सुरक्षा वगैरे असते की नाही ?

आता सर्व काही पुन्हा धडा शिकवतील ? पुन्हा चार सहा महिन्याने पुनरावृत्ती होईल का ? आपण असेच गाफील राहू का ? या सर्व घटना मनात सारख्या घर करून आहेत. असो निष्पाप पर्यटकांच्या आत्म्यास शांती लाभो !!
भावपूर्ण श्रद्धांजली !!

— लेखन : कवी शांतीलाल ननवरे. बारामती
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version