Home साहित्य काही अलक

काही अलक

3

१. अविचार

ती त्याच्या दिसण्यावर भाळली. त्याच्या प्रेमापुढे तिच्या आई वडिलांचे प्रेम फिके पडले. ती त्याच्या सोबत पळून गेली. परत एक अविचारी मुर्ख मुलगी लव्ह जिहादची बळी ठरली.

२. कुंकू

तिने नव्या संसाराची स्वप्न रंगवून पहलगामला जाऊन सुखी संसाराची पहल केली. धर्माच्या नावाखाली अधर्मियांनी तिचा सिंदूरच पुसला आणि पहल वयाच्या आधीच संसाराचा अंत झाला.

३. मास्टरमाईंड

काही दिवसांपासून तो रोज मंदिरात यायचा. तिथे रमायचा.मंदिरातल्या भाविकांशी त्याची छान मैत्री झाली. एक दिवस त्या मंदिरात स्फोट झाला.अनेक भक्त मारल्या गेले . नंतर कळले की तोच त्या स्फोटाचा मास्टरमाईंड होता.

४. खरी श्रद्धांजली

बॉम्ब स्फोटात बसमधील चाळीस जवान शहीद झाले. दुर्दैवं असे की, प्रत्येकाच्या शरीराच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्या.तेरा दिवस दुखवटा पाळला गेला. पण खरी श्रद्धांजली तेव्हा वाहिली गेली, जेव्हा चौदाव्या दिवशी बालाकोट उडवून तिनशे आतंकवाद्यांच्या चिंधड्या उडवल्या गेल्या.

५. लोकल

मुंबई लोकल ट्रेन, चाकरमान्यांची जीवनसंगिनी. पण त्या काळ्या दिवशी जीवघेणी ठरली.सात लोकल साखळी बॉम्ब स्फोटाने उडविण्यात आल्या. कित्येक संसार, कित्येकांचे आधार काही क्षणात उध्वस्त झाले. सरकारने मुठभर नुकसान भरपाई देऊन समाधान मानले.न्याय मिळायला कित्येक वर्षे जातात.पण मनावरच्या जखमा तश्याच ओल्या राहतात.

— लेखन : सौ. शितल अहेर. खोपोली, रायगड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

3 COMMENTS

  1. शितलचे सारेच अलक खूप छान आहेत ,प्रत्येकावर विस्तृत कथा लिहू शकू असे.खूप खूप शुभेच्छा शितल! असेच लिखान चालू ठेव!..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version